Type Here to Get Search Results !

उधवा येथे ईद-ए-मिलाद शांतीपूर्ण जुलूसासाठी बैठक संपन्न

उधवा येथे ईद-ए-मिलादच्या शांतीपूर्ण जुलूसासाठी बैठक संपन्न


डहाणू : जितेंद्र टोके


ईद-ए-मिलाद या पवित्र सणानिमित्त उधवा परिसरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीपूर्ण जुलूस काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलूसाची तयारी, शिस्त आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उधवा पोलीस चौकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक पार पडली. 


दरवर्षीप्रमाणे यंदाही उधवा परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शांतीपूर्ण जुलूस काढण्यात येणार आहे. त्याआधी ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उधवा पोलीस चौकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी जुलूसादरम्यान शिस्त, शांतता आणि भाईचारा राखण्याचे तसेच प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक आणि पोलिसांकडून करण्यात आले. याशिवाय पोलिस विभागाकडून सायबर क्राईमविषयी जागृतीपर सूचना देण्यात आल्या तर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.


या बैठकीस उधवा सुन्नी जुम्मा मजिद ट्रस्टचे ट्रस्टी, मान्यवर सदस्य, पत्रकार अशरफ खान यांच्यासह उधवा गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. बैठकीत एकजुटीचा आणि धार्मिक सलोख्याचा संदेश देण्यात आला असून जुलूसाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष भर देण्यात आला. भाईचारा, शांती आणि एकोपा जपत यंदाचा ईद-ए-मिलाद जुलूस यशस्वी करण्याचा निर्धार मुस्लिम बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.





Post a Comment

0 Comments