प्रेमसंबंधातून खून; पालघर पोलिसांची गुजरातेत धडक, आरोपीला अटक
डहाणू : (दि.२०, सप्टेंबर)
बोईसर तारापुर परिसरातील परनाळी येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये हरिश सुखाडीया (३०) याचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. याबाबत तारापुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खुनाचा गुन्हा पालघर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन आरोपींना गुजरातहून अटक केली आहे.
सदर घटना ०३ सप्टेंबर रोजी परनाळी येथील बालाजी कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग क्रमांक ०२ मधील रूम क्रमांक ०२ मध्ये घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तारापुर पोलिसांच्या स्वतंत्र पथकांना तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांत शोधमोहीम राबवली. बातमीदारांच्या मदतीने व तांत्रिक तपासाअंती सुरेंद्र चंद्रसिंह (३४) व रेखा दुर्गादास वैष्णव (२५) मूळ राहणारे राजस्थान या आरोपींना वापी (गुजरात) येथून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली दिली. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तारापुर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. पुढील तपास सपोनि निवास कणसे करीत आहेत.



Post a Comment
0 Comments