Type Here to Get Search Results !

बोईसरमध्ये ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोरील ट्रकमधून बॅटरीची चोरी

बोईसरमध्ये ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोरील ट्रकमधून बॅटरीची चोरी


बोईसर, ता. १७ (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील मधुरनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने १०,००० रुपये किमतीची बॅटरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर घटना १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान घडलेली आहे, ज्यावेळी टाटा कंपनीचा २५१५ मॉडेलचा ट्रक (एम-एच ०४ ई-एल ११५३) महाराष्ट्र गोल्डन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कार्यालयासमोर उभा असताना अज्ञात व्यक्तीने त्या ट्रकचे बोनट उघडून एलांट्रा पावर ऑटोमोटीव्ह ईपीबी-१५० या कंपनीची १५० व्होल्ट क्षमतेची बॅटरी चोरून नेली. दरम्यान ट्रकचे बोनेटदेखील तोडून नुकसान करण्यात आले. याप्रसंगी फिर्यादी जावेद सुभेदार खान (वय ३५, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. महावीर चेंबर, बोईसर) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून बॅटरी चोरीला गेल्याने फिर्यादीचे अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अज्ञात आरोपी विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२), ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments