Type Here to Get Search Results !

वंचित भगिनींकडून ‘रेस्क्यू फाउंडेशन’च्या मुलींसोबत दिवाळी साजरी

वंचित भगिनींकडून ‘रेस्क्यू फाउंडेशन’च्या मुलींसोबत दिवाळी साजरी


वंचित बहुजन महिला आघाडीचा उपक्रम; आनंद, संवेदनशीलता आणि मानवतेचा सुंदर संगम, रेस्क्यू फाउंडेशनच्या मुलींच्या जीवनात उजळली दिवाळी



बोईसर : समाजातील वंचित व गरजू भगिनींना आनंदाचे क्षण देण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन महिला आघाडी (व.वि.श.म.क्षेत्र) तर्फे रेस्क्यू फाउंडेशन, फुलाचा पाडा, लालोंडे, बोईसर येथे विशेष दिवाळी साजरी करण्यात आली. रेस्क्यू फाउंडेशनमधील मुलींना दिवाळीच्या निमित्ताने भेट देऊन त्यांच्यासोबत आनंद वाटण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर प्रत्यय ठरला.


गुरुवार, दि.२३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेस्क्यू सेंटरमधील मुलींना भेटवस्तू, फटाके आणि खास दिवाळी फराळ देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. मुलींनीही आनंदाने दिवाळी साजरी करत पाहुण्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद पाहून सर्व उपस्थितांना समाधान लाभले. या उपक्रमाद्वारे वंचित बहुजन महिला आघाडीने समाजातील बांधिलकी आणि मानवतावादी मूल्यांचे दर्शन घडवले. रेस्क्यू फाउंडेशनच्या मुलींना या दिवाळीने एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव दिला.


या कार्यक्रमावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने गीता जाधव (अध्यक्ष, वसई-दार महानगरपालिका क्षेत्र), दिपाली जाधव (सचिव), कोमल पटणे (सहसचिव), साक्षी तांबे, आरती शेजवळ आणि विद्या पाटील (सदस्य) उपस्थित होत्या. तसेच वंचित बहुजन आघाडी, पालघरचे उपाध्यक्ष संजय ढोके, सचिव विवेक राऊत, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राचे उपाध्यक्ष समीर शेख, तसेच कार्यकर्ते जाफरभाई शेख, इकबाल शेख, साकिब शेख आणि सॅम अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments