Type Here to Get Search Results !

बोंडगाव-मासूपाडा परिसरातील वीजपुरवठा समस्येवर अखेर तोडगा — आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या पुढाकाराने नवीन डी.टी.सी. मंजूर

बोंडगाव-मासूपाडा परिसरातील वीजपुरवठा समस्येवर अखेर तोडगा - आ. कॉ. विनोद निकोले यांच्या पुढाकाराने नवीन डी.टी.सी. मंजूर



डहाणू, ता.२९ ऑक्टोबर — बोंडगाव-मासूपाडा परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागासाठी नवीन 100 KVA क्षमतेचा डी.टी.सी. (Distribution Transformer Centre) उभारण्यास तसेच सुमारे 1.5 कि.मी. लांबीच्या ए.बी. केबल एल.टी. लाईन बसविण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.



बोंडगाव-मासूपाडा परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे नागरिकांना दर्जेदार, स्थिर आणि अखंड वीजपुरवठा मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून कमी दाबामुळे घरगुती उपकरणे, शेतीसाठी वापरण्यात येणारे पंप आणि लहान उद्योगधंदे यावर परिणाम होत होता. या नव्या योजनेमुळे केवळ विद्यमान वीजपुरवठा सुधारणारच नाही, तर नव्या घरजोडण्या आणि औद्योगिक जोडण्या देणेही सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल आमदार कॉ. विनोद निकोले यांचे मनःपूर्वक आभार मानले. आमदार निकोले यांनी प्रत्येक वेळी लोकांच्या अडचणींना प्राधान्य देत प्रशासनाशी सतत संवाद साधला आणि समस्येचे समाधान करून दाखविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रसंगी तालुका सेक्रेटरी कॉ. रडका कलांगडा, विभाग समिती सदस्य कॉ. जिवल्या बोबा, दशरथ बोंड, युनिट सेक्रेटरी जिगर घोसे, डीव्हायएफआय सदस्य कॉ. अजय बोबा, देवजी भुयाल यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी आमदार निकोले यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असणारे नेतृत्व म्हणून गौरविले.







Post a Comment

0 Comments