Type Here to Get Search Results !

सफाळे मालकरीपाडा येथे आद्यक्रांतिकारक वीर ‘राघोजी भांगरे’ जयंतीनिमित्त देशभक्तीचा जागर

सफाळे मालकरीपाडा येथे आद्यक्रांतिकारक वीर ‘राघोजी भांगरे’ जयंतीनिमित्त देशभक्तीचा जागर


सफाळे : सफाळे (मालकरीपाडा) येथे आज शनिवार, ०८ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त देशभक्तीचा जागर पाहायला मिळाला. परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. नागरिकांनी उत्साहाने आणि अभिमानाने जयंती सोहळ्यात सहभाग नोंदवला.



या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी त्यांच्या क्रांतिकारक कार्याची आणि बलिदानाची आठवण करून दिली. वक्त्यांनी आपल्या भाषणातून राघोजी भांगरे यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे महत्व ठळक करत, त्यांच्या शौर्याचा आणि देशभक्तीचा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवला. ग्रामीण भागातून उभे राहिलेले हे क्रांतिकारक स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे आवाहनही केले. जयंती सोहळ्याचा शेवट राष्ट्रगीताने झाला, ज्यामध्ये सर्व उपस्थितांनी एकत्र येत देशभक्तीचा नाद गुंजविला. 'जय मल्हार', 'राघोजी भांगरे अमर रहे' अशा घोषणांनी वातावरण अधिकच भारावून गेले. या सोहळ्यामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य आणि देशभक्तीची भावना निर्माण झाली असून, राघोजी भांगरे यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजात जनजागृती निर्माण करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचला.



या कार्यक्रमात रुपेश धांगडा, सुरेश भोईर, काशिनाथ वरठा, नितीन बोंबाडे, अविनाश भोईर, प्रशिल वरठा, रोहिदास कामडी, सुनिल घोष, सुनिल कोम, बबन धांगडा, प्रसाद डगले, आबाजी डगले, अजय सातलिया, प्रमोद सांबरे, विश्वनाथ मालकरी आणि नथू पिलेना यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments