डहाणूमध्ये पुन्हा दुचाकी चोरी; मसोली येथून एनटॉर्क स्कुटी गायब
डहाणू : डहाणू शहरात पुन्हा एकदा दुचाकी चोरीची घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मसोली येथील महावीर कॉम्प्लेक्स परिसरातून टीव्हीएस एनटॉर्क १२५ स्कुटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादीनुसार, डहाणू मसोली येथील महावीर कॉम्प्लेक्स, डी विंग, फ्लॅट क्र. ४ येथे राहणारे व सलून व्यवसाय करणारे अबरार अत्तार शेख यांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता आपली काळ्या रंगाची व जांभळ्या स्टीकरची टीव्हीएस एनटॉर्क १२५ स्कुटी (MH 48 DJ 0802) इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पाहिले असता दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे लक्षात आले. आसपास चौकशी करूनही गाडीचा काही ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळे त्यांनी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक १८४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चोरीस गेलेल्या स्कुटीची किंमत अंदाजे ₹४५,००० असून चेसीस क्रमांक MD626AK39S2A13580 व इंजिन क्रमांक AK3AS291480 असा आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, डहाणू परिसरात अलीकडे वाढलेल्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व नाराजीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


Post a Comment
0 Comments